Wed, Jan 22, 2020 13:40होमपेज › Konkan › बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:19PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी 

उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी, सीईटी, नीट अशा परीक्षांची तयारी करावी लागते. या परीक्षांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना सहाय्य करावे यासाठी राज्य शिक्षण मंडळ पुढे सरसावले आहे. इयत्ता 11 वी व 12 वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्‍नपेढी तयार करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांना एमएचटी, सीईटी, नीट अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची तयारी करावी लागते. विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून ऑनलाईन प्रश्‍नपेढी तयार केली जात आहे. 

प्रश्‍नपेढीत भर टाकण्यासाठी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांना प्रश्‍न पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ते प्रश्‍न विषयनिहाय तयार करून प्रश्‍नांच्या तक्त्यात इयत्ता, विषय, घटकाचे नाव व उपघटक उत्तरांच्या विश्‍लेषणासह 31 डिसेंबरपर्यंत मंडळाच्या हीींिं:/पशशींलिं.ाह-हील.रल.ळप या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. पाठवलेले प्रश्‍न हे विषयानुसार बहुपर्यायी असणे आवश्यक आहे. या प्रश्‍नांची मंडळातील तज्ज्ञांकडून तपासणी होऊन योग्य ते प्रश्‍न विद्यार्थी व शिक्षकांसाठी पोर्टलवर देण्यात येणार आहेत.