Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Konkan › ‘जि. प. बांधकाम’कडून गुहागरातील 11 रस्त्यांच्या डागडुजीचे आश्‍वासन

‘जि. प. बांधकाम’कडून गुहागरातील 11 रस्त्यांच्या डागडुजीचे आश्‍वासन

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 9:04PMशृंगारतळी : वार्ताहर

खराब रस्त्यांवरून एसटीचा प्रवास करणे धोकादायक असल्याचा अहवाल राज्य परिवहन विभागाने एसटीच्या विभागीय कार्यालयाला कळविला असून यामध्ये गुहागर तालुक्यातील 11 रस्त्यांचा समावेश आहे.पावसाळ्यामध्ये  या मार्गावरील एसटीच्या फेर्‍या अडचणीत सापडल्या असून ती बंद पडणार नाही एवढी दक्षता घेण्याची ग्वाही जि. प. सार्वजनिक बांधकामच्या गुहागर विभागाने गुहागरच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिली आहे.

गुहागर तालुक्यात  ज्या 11 मार्गांवर एसटी फेर्‍या अडचणीच्या ठरल्या आहेत ते सर्व रस्ते जि. प.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. गुहागर साखरी त्रिशूळ हा रस्ता पेवे फाटा ते साखरीत्रिशूळ पर्यंत 16 कि.मी., गुहागर धोपावे कुळेवाडी ते धोपावे 3 कि.मी., हेदवी फाटा ते उमराठ 6 कि.मी., गुहागर रोहिले खरेकोंड फाटा ते खरेकोंड 3 कि.मी, गुहागर नागझरी पालशेत फाटा ते नागझरी फाटा 4 कि.मी., गुहागर वडद वडद फाटा ते वडद 18 कि.मी.,गुहागर भातगात आवरे खोपी ते भातगात 24 कि.मी., गुहागर काजरोळकरवाडी आवरे खोपी ते काजरोळकरवाडी 17 कि.मी., आबलोली मासू आबलोली ते मासू 6 कि.मी., गुहागर पेवे कारूळ ते पेवे 3 कि.मी., गुहागर साखरीत्रिशूळ पालपेेणे हायस्कूल ते पालकोट 6 कि.मी.,असे तालुक्यातील 11 रस्ते असून या पावसामध्ये या रस्त्यांवरून राज्य परिवहनच्या वाहनांना फेर्या मारणे धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन एस.टी.चा अपघात होऊ शकतो, असा अहवाल आहे.

गुहागर तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकिमध्ये हा मुद्दा  उपस्थित करण्यात आला होता. या 11 रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी व मजबुतीकरणासाठी सध्या निधी उपलब्ध नसून तात्पुरती डागडुजी करण्याचे आश्‍वासन जि. प.बांधकाम उपअभियंता चौधरी यांनी दिले.या 11 पैकी कोणत्याही मार्गावर एसटीच्या फेर्‍या बंद होणार नाहीत तेवढी काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले.