Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Konkan › बसणीतील कुटुंबाला बहिष्कृत करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

बसणीतील कुटुंबाला बहिष्कृत करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी
नळपाणी जोडणी द्यायचे नाही, तसेच त्या कुटुंबाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवायचे नाही, असे ठरवून बहिष्कार टाकल्याप्रकरणी बसणी ग्रा.पं.मधील 10 जणांविरोधात  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी आस्था धांगडे आणि इतर 10 जण  (सर्व रा. बसणी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नीलेश गणपत मांडवकर (42, रा.  बसणी, रत्नागिरी सध्या. रा. मुंबई) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, मांडवकर यांनी बसणी या आपल्या मूळ गावी घरासाठी बसणी ग्रामपंचायत नळपाणी योजनेतून कनेक्शन मिळावे, यासाठी ग्रामपंचायत व नळपाणी कमिटीकडे अर्ज केला होता. परंतू, संशयित आरोपींनी त्यांच्या अर्जाचा विचार न करता  कोणताही निर्णय घेतला नाही. मांडवकर आपल्याला नळपाणी कनेक्शन मिळावे, यासाठी बसणी ग्रामपंचायतीकडे 10 नोव्हेंबर 2017 ते 15 जून 2018  या कालावधीत सतत पाठपुरावा करत होते. मांडवकर कनेक्शनसाठी सतत पाठपुरावा करत असल्याच्या रागातून त्यांना नळपाणी कनेक्शन द्यायचे नाही, असे  आरोपींनीं संगनमताने ठरवले. तसेच मांडवकर यांच्या कुटुंबाला सार्वजनिक नळपाणी योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवून त्यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावयाचे नाही, असेही ठरवून त्यांच्यावर बहिष्कार टाकला.