Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Konkan › नाणीज येथील विचित्र अपघातात दहा प्रवासी जखमी

नाणीज येथील विचित्र अपघातात दहा प्रवासी जखमी

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 9:21PMरत्नागिरी :प्रतिनिधी

समोरून भरधाव वेगाने ओव्हरटेक करत येणार्‍या कारला बाजू देताना रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील एस. टी. बस झाडावर आदळून अपघात झाला. नाणीज येथील हायस्कूलजवळ रविवारी दुपारी 1 वा. सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक-वाहक यांच्यासह  10 प्रवासी जखमी झाले. प्रवाशांना पाली येथील प्रा. आ. केेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चालक व वाहक गंभीर जखमी झाल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी एसटी बस (क्र. एमएच-14/जीटी-2259) ही नाणीज येथे आली असता ओव्हरटेक करून येणार्‍या वॅगनआर कारला (एमएच-03/एस-7790) बाजू देताना हा अपघात झाला. 

या अपघातात हमिद अश्रफ हमदुले (वय 21, रा. चिपळूण), दिलीप नामदेव कांबळे (42, चाफोली), विजय शांताराम कांबळे (42, चाफोली), गणपत गोविंद घाटकर (52, निवसर), रोशन दाउद झारी (63, रत्नागिरी), जयबून निसा अहमद मुजावर (70, विशाळगड), गौरव दत्तात्रय डोंगरे (42, संगमनेर), संदीप शिवराम सुर्वे (38, रत्नागिरी) हे प्रवासी जखमी झाले. त्यांना  उपचारांसाठी पाली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त एसटी बसचे चालक एम. ए. पटेल  तसेच वाहक  मनीषा लोले (30) याही गंभीर जखमी आहेत. या दोघांनाही अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 

या अपघातात एसटी बससह कारचेही नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच नाणीज येथील जगद‍्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेसह शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णांना रुग्णालयात  दाखल केले.