Sun, Sep 23, 2018 22:20होमपेज › Konkan › काळसे येथे स्कूटर अपघातात स्वार ठार

काळसे येथे स्कूटर अपघातात स्वार ठार

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 10:59PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

मालवण-कुडाळ मार्गावरील काळसे-हुबळीचामाळ येथे झालेल्या दुचाकी अपघातात एकनाथ  गणपत हिंदळेकर ( 55, रा. वालावल-कुडाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. हिंदळेकर हे वालावल येथून काळसे-भंडारवाडी येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी येत असताना नातेवाईकांच्या घरापासून काही अंतरावर  हा अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्‍तस्त्रावाने मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा. झाला.

एकनाथ हिंदळेकर व सुहास नाईक (काळसे) हे दोघ काळसे येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी येत होते.  हुबळीचा माळ येथे हिंदळेकर यांचा  टीव्हीएस वेगो  दुचाकीवरील ताबा सुटला. यात ते रस्त्याच्या डाव्या बाजूला जोरदार धडकले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या मागे बसलेले सुहास नाईक यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. मयत  हिंदळेकर यांचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. कट्टा दूरक्षेत्राचे पोलिस उत्तम आंबेरकर, योगेश सराफदार, स्वप्नील तांबे यांनी अपघाताचा पंचनामा केला.