Wed, Apr 24, 2019 08:25होमपेज › Konkan › ओखी वादळामुळे मच्छीमारांचे १ कोटी ८४ लाखाचे नुकसान

ओखी वादळामुळे मच्छीमारांचे १ कोटी ८४ लाखाचे नुकसान

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:43PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

डिसेंबर महिन्यात उदभवलेल्या ओखी वादळामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मश्‍चिमारबांधवांना फार मोठा फटका बसला आहे. या वादळात जिल्ह्यातील 12 बोटी आणि आणि तब्बल 772 जाळी वाहून तुटून तब्बल 1 कोटी 84 लाख,48 हजार 120 रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसान भरपाईसाठी तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला असून नुकसान भरपाई पोटीची रक्कम प्राप्त होताच तिचे वाटप केले जाईल असे जिल्हाधिकारी उदय चौधारी यानी स्पष्ट केले.  या वादळात जिल्ह्यातील मच्छिमारांचे तब्बल 1 कोटी,  84 लाख, 48 हजार 120 रुपयांचे नुकसान झाले आहे. यात 12 बोटी बुडाल्या किंवा फुटल्याने 31 लाख 17 हजार 600 रुपयांचे, तर 772 जाळी वाहून गेल्याने 1 कोटी, 53 लाख, 31 हजार 520 रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात 772 जाळ्यांचे मिळून एकूण 1 कोटी 53 लाख 31 हजार 520 रुपयांचे नुकसान झाले असून यात मालवण तालुक्यातील खवणे बिच येथे 39 जाळयांचे 7 लाख 76 हजार, कुर्लेवाडी 381 जाळी 8 लाख 79 , रेड़ी 26 जाळ्या 5 लाख 500 रुपये , केळुस 15 जाळी 20 हजार, देवगड़ तालुका तांबळडेग 60 जाळी 5 लाख 10 हजार, मालवण तालुका रापाण संघाच्या। 6 मोठ्या जाळयांचे 38 लाख 54000, देवबाग 216 जाळी 62 लाख 10 हजार 20 रुपये, वायंगणी 4 जाळी 14 लाख 50 हजार आणि वायरी 5 जाळ्यांचे 10 लाख 92 हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे.