Sun, Jan 19, 2020 16:50होमपेज › Kolhapur › कुरुंदवाड पालिका : ‘स्वीकृत’साठी जम्बो जमादारांच्या नावावर शिक्कामोर्तब

कुरुंदवाड पालिका : ‘स्वीकृत’साठी जम्बो जमादारांच्या नावावर शिक्कामोर्तब

Published On: Jul 16 2019 10:39PM | Last Updated: Jul 16 2019 10:39PM
कुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरुंदवाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी जम्बो जमादार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती नगराध्यक्ष जयराम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. जमादार यांच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कुरुंदवाड पालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण खबाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी नगरसेवक का बरोबरच अनेक इच्छूक कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली होती. शहराध्यक्ष पाटील यांच्या रणनीतीमुळे स्वीकृत नगरसेवक पदाबाबत चुरस निर्माण झाली होती. अखेर आज (मंगळवार) जम्बो जमादार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेला नाट्यमय घडामोडीवर अखेर पडदा पडला.

दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदाचा विषय संपला असला तरी उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आपल्या परीने आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याने नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यापुढे नव्या डोकेदुखीचा विषय लवकरच सुरू होणार असल्याचे पालिका वर्तुळात चर्चा आहे.