Tue, Sep 25, 2018 11:30होमपेज › Kolhapur › इचलकरंजी : दारुला पैसे  न दिल्याने मित्राचा खून

इचलकरंजी : दारुला पैसे  न दिल्याने मित्राचा खून

Published On: Jul 01 2018 12:01PM | Last Updated: Jul 01 2018 12:01PMइचलकरंजी : पुढारी ऑनलाईन

येथील दत्तनगर येथे एका युवकाचा खून झाला. काल ( शनिवार दि. ३०) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी मृत युवकाच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,इचलकरंजीतील विजय जनार्दन सरदेसाई, वय 27 वर्षे याचा खून मित्रांनीच केल्याचे उघडकीस आले आहे. दारू प्यायला पैसे देत नसल्याच्या कारणातून मित्रांनीच खून केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून रजाक इमाम शेख व इस्माईल आयुब शेख दोघे रा.इचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे.