गडहिंग्लजमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडले

Last Updated: Oct 11 2019 1:48AM
Responsive image

Responsive image

गडहिंग्लज ः प्रतिनिधी

येथील मुख्य रस्त्यावर दुचाकी लावून उभे राहिलेल्या तरुणाला भरधाव कारने चिरडले. यात संतोष शिवाजी कोकीतकर (33, रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान, संतोष कारखालीच सापडला होता. नागरिकांनी कार उचलून त्याला बाहेर काढले. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणार्‍या चालक दत्तात्रय बाबूराव शेडेकर (रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष आजारी असल्याने दवाखान्यात उपचारासाठी आला होता.  उपचारानंतर बाजारात किरकोळ साहित्य खरेदी करून तो आपल्या गावी जाणार होता. शहरामधील सुभाष टॉकीजच्या विरोधी बाजूला दुचाकी  लावून मागे वळत असतानाच भरधाव कारने (एमएच 14 सीएक्स 6651) संतोषला जोरदार धडक दिली. यामध्ये तो गाडीखाली सापडला. नागरिकांनी कार बाजूला करून संतोषला वाहतूक पोलिस तडवी यांनी दवाखान्यात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

संतोषच्या मृत्यूने महागाववर शोककळा पसरली. नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा सर्वांचे मन हेलावून गेला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थव्यवस्‍थेचे भले होणार नाही : पृथ्‍वीराज चव्हाण 


'चारधाम' यात्रेचा प्रवास झाला सुकर


खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा


चाळीस लाखांहून अधिक प्रवासी मजूर पोहोचले स्वगृही; धावल्या ३ हजार ६० विशेष श्रमिक ट्रेन


नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू


'पूर्ण वेतन न देण्याच्या प्रकरणात कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करु नये'


टोळधाडीचं संकट विदर्भात धडकलं; संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे नुकसान


विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश भावूक


आजरा कारखान्यावर अखेर जिल्हा बँकेचा ताबा


बीड : अडीच महिन्यांनंतर उघडली दारू दुकाने, सकाळपासूनच रांगा