Wed, Nov 21, 2018 16:12होमपेज › Kolhapur › शाहूनगरात तरुणाची गळफासाने आत्महत्या

शाहूनगरात तरुणाची गळफासाने आत्महत्या

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजारामपुरी येथील तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. अनिल यल्लाप्पा मोहिते (वय 25, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. तो गवंडी कामगार होता. दोन-तीन दिवसांपासून तो नैराश्यात होता. आई, वडील मजुरीसाठी सकाळी घराबाहेर गेल्यानंतर त्याने लोखंडी अँगलला  गळफास लाऊन घेऊन आत्महत्या
केली. दुपारी चुलतभाऊ घराकडे आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. आई, वडिलांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला. तो अविवाहित होता.