Thu, Nov 15, 2018 18:00होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : जरगनगरमध्ये गोळ्या झाडून तरूणाचा  खून

कोल्हापुरात तरुणाची गोळ्या झाडून हत्या

Published On: May 21 2018 11:52AM | Last Updated: May 21 2018 11:52AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

जरगनगरमध्ये एका तरूणाच्या डोक्‍यात गोळी झाडून खून करण्यात आला आहे. प्रतीक प्रकाश पोवार (वय, ३० द्वारकानगर दत्‍त मंदिराजवळ पाचगाव रोड जरगनगर) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. रविवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. 

जरगनगर नाका ले आउट क्रमांक चारच्या मुख्य रस्‍त्‍यावर हा प्रकार घडला. घटनेचे माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह पथक घटनास्‍थळी दाखल झाले. घटनास्‍थळी पोलिसांना एक पुंगळी सापडली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, पोलिस घटनास्‍थळी पोहचल्‍यानंतर त्‍याठिकाणी दोन तरूण उपस्‍थित होते. प्रतीक याला एक फुट अंतरावरून गोळ्या झाडण्यात आल्‍याचे त्‍या तरूणांनी पोलिसांना सांगितले. प्रतीकवर कोणी गोळ्या झाडल्‍या याचीही माहिती त्‍या दोन तरूणांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्‍थळी स्‍ट्रायकिंग फोर्स मागविला होता. 

 

Tags : kolhapur jaragnagar,  murder, crime