Thu, Jun 20, 2019 02:17होमपेज › Kolhapur › गारगोटी-कडगाव रोडवर अपघातात युवक ठार

गारगोटी-कडगाव रोडवर अपघातात युवक ठार

Published On: Apr 16 2018 3:38PM | Last Updated: Apr 16 2018 3:30PMगारगोटी : प्रतिनिधी

गारगोटी-कडगाव रोडवर करडवाडी नजीकच्या ओढ्यावरील पुलावरून टाटा सुमो कोसळून सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला. शुभम मधुकर नांदेकर (वय-22 रा. तिरवडे) असे मृताचे नाव आहे.

शुभम तिरवडे येथून पहाटे सहाच्या सुमारास गारगोटीकडे टाटा सुमो (एम.एच. 04 एच. एम. 3468) घेऊन येत होता. करडवाडी नजीकच्या दोरडाच्या ओढ्यावरील पुलावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडी थेट सुमारे वीस फुटावरून ओढ्यात कोसळली. 

या अपघातात शुभमला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला गारगोटी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने तिरवडे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील व मोठी बहिण असा परिवार आहे. शुभमचा मृत्तदेह पाहूण त्याच्या आईने फोडलेला हंबरडा सर्वांचे र्‍हदय पिळवटून टाकणारा होता.

Tags : young boy, death, accident, gargoti kadgavon road, kolhapur news