Wed, Mar 27, 2019 02:26होमपेज › Kolhapur › ५५ हजार शेतकर्‍यांची ‘यलो’ यादी

५५ हजार शेतकर्‍यांची ‘यलो’ यादी

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:05AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 55 हजार शेतकर्‍यांची यलो यादी राज्य शासनाने जिल्हा बँकेकडे पाठवली आहे; मात्र ही यादी पाहूनच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या यलो यादीची तपासणी कशी करावी, यासाठी सोमवारी जिल्हा परिषद सोसायटीत हे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 58 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आत्तापर्यंत 90 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच शासनाने 78 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची ग्रीन यादी प्रसिद्ध केली होती; मात्र या यादीत 
आ. प्रकाश आबीटकर यांचे नाव आल्याने राज्यभर गोंधळ उडाला. आ. आबीटकर यांनी अर्ज न भरताच त्यांना कर्जमाफी मिळाल्याने सरकारच्या कामाचे वाभाडे निघाले. त्यामुळे शासनाने ही यादीच रद्द केली.

दोन दिवसांपूर्वी शासनाने ही यादी जिल्हा बँकेला पाठवली आहे. ज्या शेतकर्‍यांची नावे या यादीत आहेत, त्यांच्या अर्जांची छाननी करणे, बँकेची माहिती व ऑनलाईन अर्जातील माहितीची खात्री करणे, कर्जाची व माफीची रक्‍कम तपासणे, आधार कार्ड व इतर कागदपत्रांची छाननी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.