Sun, Mar 24, 2019 23:34
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › बालिकेवर लैंगिक अत्याचार

बालिकेवर लैंगिक अत्याचार

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 2:04AMयड्राव : वार्ताहर

तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित विशाल अनिल सिंग (वय 24, रा. शिरगावे चाळ, पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ, यड्राव) या नराधमास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 31 जानेवारी रोजी पीडित मुलगी लहान मुलांबरोबर खेळत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आल्यानंतर तिच्या आईला कपड्यांवरून संशय आला. मुलीकडे विचारणा केल्यानंतर ती संबंधित तरुणाच्या खोलीकडे आईला घेऊन गेली. लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात येताच आईने विशाल याच्याकडे विचारणा केली.

त्यावेळी त्याने तसे काहीही केले नसल्याचे सांगितले. मात्र, मुलीकडे घरी अधिक विचारपूस केल्यानंतर घडलेला प्रकार लैंगिक अत्याचाराचा असल्याचे लक्षात आले. आईने हा प्रकार भीतीपोटी पतीस सांगितला नाही. पतीने विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार समजला. स्थानिक  नागरिकांनी आज दुपारी विशाल सिंग याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.