सरवडे : वार्ताहर
सरवडे (ता.राधानगरी) येथील आमदार किसनराव मोरे यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्त घेतलेल्या कुस्ती मैदान महान भारत केसरी पै योगेश बोंबाळे यांने प्रतिस्पर्धी उप महाराष्ट्र केसरी योगेश पवार ला तिसर्या मिनिटात लपेट डावावर अस्मान दाखवत मैदान मारले. या मैदानात प्रथम क्रमांकासाठी दोन कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या.
प्रारंभी आखाडा पुजन उद्योजक विनायक राऊत यांनी तर प्रतिमा पुजन पिराजी शेटके यांनी केले. प्रथम’ क्रमांकासाठीच्या दुसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरुद्ध भगवंत केसरी बाला रफीक शेख यांच्यात झाली. या लढतीत समाधानने पहिल्यांदा बाला वर कब्जा मिळविला. परंतु बालाने मच्छी कोटा डावाचा वापर करत हा कब्जा धुडकावून लावत 14 व्या मिनीटाला घिस्सा डावावर समाधान ला अस्मान दाखविले. दोन नंबरची कुस्ती बिभीषण माडेकर विरुद्धउदयराज पाटील यांच्यात झाली. या लढतीत उदयराजने हबकी डावाचा वापरुन बिभीषणला चितपट केले. या मैदानातील विजेते मल्ल असे, अंगज बुलबुले, रोहन रंडे, सोनबा सोनटक्के, संग्राम काकडे, अजय मट्टी, पवन शिंदे, इंद्रजित मोळे, सतीश अडसुळ, शुभम पाटील, विशाल तिवले, दिपक डोंगरे, विश्वजीत मोरे, शहारुख मुल्लाणी, दयानंद भोईटे, सुरेश खोंद्रे, अवधुत चौगले, सुभाष निऊगडे, सरदार पाटील आदी मल्लांच्या चटकदार ,लक्षवेदी कुस्त्या झाल्या.
स्वागत बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांनी केले. मैदानास आ. प्रकाश आबिटकर, उद्योजक विनायक राउत, अरुणराव जाधव, जि. प. सदस्य जीवन पाटील, डी. एस. पाटील, शिक्षक बँक संचालक नामदेवराव रेपे, राजेंद्र यादव, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निवेदन कृष्णात चौगले, सर्जेराव मोरे यांनी केले. आभार माजी पं. स. सदस्य आर. के.मोरे यांनी मानले.