Sun, Nov 18, 2018 09:08होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या माऊलीनं मारलं कर्नाटकचं मैदान

कोल्‍हापूरच्या माऊलीनं मारलं कर्नाटकचं मैदान

Published On: Dec 04 2017 4:22PM | Last Updated: Dec 04 2017 4:26PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पैलवानाने कर्नाटकमधील जमखंडीचे मैदान मारत महान भारत केसरीचा किताब पटकावला. माऊली जमदाडे असे त्या पैलवानाचे नाव असून, पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत त्याने पंजाबच्या अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट केले. 
भारतीय कुस्ती संघाच्या वतीनं जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात माऊलीने विजयी पताका फडकवली. विजेता माऊली याला २ लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.  
माऊली गंगावेश तालमीत सराव करतो. त्यामुळे गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊलीचं जोरदार स्वागत केलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे यानं मिळवला होता.