Wed, Jul 17, 2019 12:48होमपेज › Kolhapur › रेल्वे धावणार... प्रगती होणार!

रेल्वे धावणार... प्रगती होणार!

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 12:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील व्यापार, पर्यटन वाढणार आहे. त्याबरोबर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या रेल्वे मार्गाने कोल्हापूरचे रेल्वेच्या नकाशावरील स्थान ठळक होणार असून, या परिसरात रेल्वेचे जाळे विस्तारणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाची तत्कालीन रेल्वेेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 च्या अखेरच्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यासाठी निधीही मंजूर केला. राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने होणार्‍या या रेल्वे मार्गाला आता केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने त्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. वाणिज्यमंत्री प्रभू यांनी घेतलेल्या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबतच्या निर्णयाची स्पष्टता झाली आहे. यामुळे येत्या पाच-सहा वर्षांत हा मार्ग अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व अधिक आहे. हा मार्ग झाल्याने या परिसरातील व्यापार, उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग झाल्यानंतर राज्याचा नव्हे तर देशाच्या विकासात त्याचा मोठा हातभार लागणार आहे. या मार्गामुळे देशाची पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टी थेट लोहमार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे हा मार्ग म्हणजे देशातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रभू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या मार्गामुळे जयगड बंदराचे अंतर कमी होणार असून, साखर, कापड आदींसह औद्योगिक साधनसामूग्री निर्यात सुलभ होणार आहे. खते, अन्नधान्य आदींची आयात-निर्यातही यामुळे अधिक सोपी होणार आहे. या मार्गावर रो-रे सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी 
होईल, त्याचबरोबर इंधन बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.