Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Kolhapur › रणरागिणींच्या राजधानीत महिलांचे कुस्ती मैदान

रणरागिणींच्या राजधानीत महिलांचे कुस्ती मैदान

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 11 2018 1:07AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

रणरागिणी ताराराणी यांची राजधानी असणार्‍या कोल्हापुरात प्रथमच महिला कुस्तीगिरांसाठी स्वतंत्र पहिलेच मैदान आयोजित करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील युगंधरा फौंडेशनतर्फे हे कुस्ती मैदान होणार आहे. शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून व्यंकोबा मैदानावर महिलांच्या कुस्तीचे मैदान होणार असून यात सुमारे 50 लढतींचा थरार कुस्तीप्रेमींना पाहायला मिळणार आहे. 

वाचा बातमी : महाराष्ट्र केसरीसाठी आसूसली कुस्ती पंढरी

मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती वडणगे (ता. करवीर) येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने विरुद्ध मेरठ (उत्तर प्रदेश) येथील पीएसआय पै. मनू तोमर यांच्यात होणार आहे. दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती विश्रांती पाटील (आमशी) विरुद्ध प्रतीक्षा बाराडी (पुणे), तिसर्‍या क्रमांकाची लढत संजना बागडी (तुंग) वि. श्रद्धा भोसले (मुरगूड) आणि चौथ्या क्रमांकाची कुस्ती वैष्णवी कुशाप्पा वि. स्मिता माळी आणि पाचव्या क्रमांकाची कुस्ती प्रिया कारंडे वि. भाग्यश्री फंड यांच्यात होणार आहे. 

स्पर्धेचे उद्घाटन शामराव फडके व साहिल कुलकर्णी यांच्या हस्ते आणि क्रीडापटू तृप्ती माने, ईश्‍वरी वरदाई, आदिती बुगड, करिश्मा रिकीबदार, आदिती गायकवाड, अश्‍विनी मळगे, प्रिती कारवा, तेजस्विनी मगदूम यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. कुस्तीप्रेमींनी मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.