Tue, Jan 22, 2019 03:51होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात प्रतिवर्षी होणार महिलांची फुटबॉल लीग

कोल्हापुरात प्रतिवर्षी होणार महिलांची फुटबॉल लीग

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 10:59PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात पुरुषांप्रमाणेच महिला संघात फुटबॉल लीग (साखळी) स्पर्धा आयोजित केली जाईल. यंदाची पहिली लीग स्पर्धा 21 ते 27 मे या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असल्याची घोषणा वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो.चे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे आणि स्पर्धा समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांनी केली. 

शतकी परंपरा लाभलेल्या फुटबॉल खेळात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोल्हापूर वुमन्स फुटबॉल क्लबच्या वतीने यंदाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीची संघ निवड प्रक्रिया नुकतीच ऑक्शन (बोली) पद्धतीने झाली. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, रवी पाटील, झुंजार सरनोबत, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, सौ. तेजस्विनी सरनोबत आदी उपस्थित होते. 

बक्षिसांचे पाठबळ...

महिला फुटबॉलपटूंना पाठबळ म्हणून भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघास 31 हजार व चषक, उपविजेत्या संघास 21 हजार व चषक, मालिकावीरास 5 हजार व गौरव चिन्ह, चार उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी 3 हजार व गौरव चिन्ह, प्रत्येक सामन्यातील दोन लढवैय्या खेळाडूंना प्रत्येकी एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. आयकॉन खेळाडूंना प्रत्येकी 5 हजारांचे मानधन, सर्व महिला खेळाडूंना कीट आणि बॉल बॉईज ऐवजी बॉल र्ग्लस अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण स्पर्धा असणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक अमित साळोखे, सूर्यजित माने यांनी केले आहे.