होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू

कोल्हापुरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:38AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

राजोपाध्येनगर येथील पुष्पलता प्रकाश धस (वय 42) यांचा स्वाईन फ्लूने उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.स्वाईन फ्लूने जिल्ह्यातील तिसरा बळी घेतल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण असून, जिल्हा आरोग्य विभाग हादरला  आहे. 

पुष्पलता धस यांना 3 सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली.त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाचा, तर येलूर (ता. वाळवा) येथील दोघांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. जानेवारी 2018 पासून आजअखेर 91 हजार 350 रुग्णांची स्वाईन फ्लू तपासणी झाली आहे. यामध्ये 1082 रुग्णांना स्वाईन फ्लूने बाधित आढळले असून, त्यापैकी चौघांचा या रोगाने बळी घेतला आहे. सध्या शहरातील खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे नऊ आणि संशयित पाच रुग्ण उपचार घेत आहेत.