Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात खड्ड्याने घेतला महिलेचा बळी 

कोल्हापुरात खड्ड्याने घेतला महिलेचा बळी 

Published On: Aug 18 2018 1:21AM | Last Updated: Aug 18 2018 1:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रस्त्यावरचा खड्डा चुकविताना तोल जाऊन, डोक्यावर पडून जखमी झालेल्या रूक्साना मन्सूर देसाई (वय 40, रा. शनिवार पेठ) यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 14) सकाळी त्या पतीसमवेत नागाळा पार्क येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. धार्मिक कार्यक्रम आटोपून पतीसमवेत दुचाकीवरून घराकडे परतत होत्या.

कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेजसमोरील रस्त्यावरील खड्डा  पावसाच्या पाण्याने भरलेला होता. तो चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला. दोघेही खड्ड्यात पडले. डोक्याला इजा झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर बनली. पती मन्सूर यांना किरकोळ इजा झाली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. महिलेची शुक्रवारी सकाळी प्रकृती चिंताजनक बनली. तत्काळ अतिदक्षता विभागात त्यांना हलविण्यात आले. 
मात्र, उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाईकांसह शनिवार पेठ परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.