Wed, Jul 24, 2019 06:33होमपेज › Kolhapur › धक्कादायक ! सासऱ्याने कोयत्याने तोडले सूनेचे हात

धक्कादायक ! सासऱ्याने कोयत्याने तोडले सूनेचे हात

Published On: Feb 14 2018 10:13AM | Last Updated: Feb 14 2018 10:16AMपन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ, सावर्डे येथे सासऱ्याने आपल्या सुनेचे हात कोयत्याने तोडल्याची घटना  घडली आहे. ही घटना आज (बुधवार १४ फेब्रुवारी) सकाळी सहाच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडलाचे समजते. घरात पाणी तापवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे येथील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ७०) याने सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३२) हिच्या हातावर कोयत्याने वार केले. कौटुंबिक वादातून पांडुरंग याने घरातच सूनेवर हल्ला केला. यावेळी शुभांगी यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मयुरेश व कनिष्का या तिच्या मुलांनाही दुखापत झाली आहे. शुभांगीला सीपाआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुनेवर हल्ला करणाऱ्या पांडुरंग सातपूते याला कळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शुभांगी यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.