Sun, Feb 24, 2019 10:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 12:52AMकोल्हापूरः प्रतिनिधी 

शहरात शुक्रवारी पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे महिलावर्गाचे प्रचंड हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा खंडित केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कदमवाडी परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा होतो. आज पाणी येण्याचा दिवस असतानाही पाणी न आल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरात पाच टँकरद्वारे 45 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचापुरवठा करण्यात आला. 

कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राच्या वतीने 31 ठिकाणी पाणीपुरवठा झाला. यात कसबा बावड्यातील पाटील गल्ली, हनुमान मंदिराजवळ, चौगले गल्ली, शुगरमिल परिसर, लाईन बझार, पोलिस लाईन, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, टेंबलाईवाडी, टाकाळा, शिवाजी पेठ आदीचा समावेश होता. कळंबा जलशुद्धीकरण केंद्रातून राजाराम चौक, जवाहरनगर, आपटेनगर, महापालिका परिसर, संभाजीनगर परिसर आदी 14 ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, बालिंगा शुद्ध जल उपसा केंद्राजवळ मुख्य दाब नलिकेस मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.