Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Kolhapur › पोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी

पोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

वारणानगर येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरीप्रकरणी ‘सीआयडी’ने पुन्हा चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. कोल्हापूर व सांगली पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षकांसह चार अधिकार्‍यांकडे सखोल चौकशी करण्यात आली आहे. आणखी तीन अधिकार्‍यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी अथवा मंगळवारी संबंधितांची चौकशी शक्य आहे, असे सांगण्यात आले.

‘सीआयडी’च्या वरिष्ठ सूत्राकडून वृत्ताला दुजोरा देण्यात आला. तपास पथकातील अधिकार्‍यांनाच सीआयडी चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने पोलिस वर्तळात खळबळ उडाली आहे.वारणानगर चोरीप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची कोल्हापूर व सांगली पोलिस दलामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू होती. मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला याने साथीदाराच्या मदतीने केलेल्या मुख्य गुन्ह्यांचा तपास सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचा निलंबित अधिकारी व संशयित विश्‍वनाथ घनवटसह अन्य पोलिस करीत होते.
अप्पर महासंचालकांच्या सूचनेमुळे तपासाच्या व्याप्तीत वाढ अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी आठवड्यापूर्वी वारणानगर चोरीचा तपास करणार्‍या सीआयडी अधिकार्‍यांची कोल्हापूर येथे गोपनीय बैठक घेऊन आढावा घेतला होता. 
पोलिस उपअधीक्षकांचीसाडेपाच तास चौकशी सीआयडी अधिकार्‍यांनी एका पोलिस उपअधीक्षकांकडे तब्बल साडेपाच तास चौकशी केली. त्यानंतर अन्य तीन अधिकार्‍यांकडे प्रत्येकी तीन तास चौकशी सुरू होती. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची अपूर्ण झालेली चौकशी सोमवारी होणार आहे.

आणखी तिघांना चौकशीसाठीहजर राहण्याच्या नोटीस आणखी तीन पोलिस अधिकार्‍यांना चौकशीसाठी येथील सीआयडी कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी अथवा मंगळवारी चौकशी शक्य आहे, असेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.