Thu, Nov 15, 2018 18:16होमपेज › Kolhapur › वारणा बँकेच्या विस्तारित कक्षासह कॅश मशिन, एटीएमचे उद्घाटन

वारणा बँकेच्या विस्तारित कक्षासह कॅश मशिन, एटीएमचे उद्घाटन

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:31PM

बुकमार्क करा

वारणानगर : प्रतिनिधी  

सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या 23 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री वारणा सहकारी बँकेच्या वारणा शिक्षण संकुलातील स्थलांतरित (एक्स्टेंशन कौंटर) कक्षाचा आणि एटीएम व कॅश डिपॉझीट मशिनचे उद्घाटन वारणा समूहाचे  प्रमुख व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. वारणा शैक्षणिक संकुलातील नवीन विस्तारित कक्ष अत्याधुनिक इंटिरिअरने सुसज्ज असून संगणकीकृत व कोअर बँकिंग प्रणालीमध्ये आहे.

या विस्तारीत कक्षातून ग्राहकांना पहिल्या दिवसापासून  24 तास एटीएम बरोबरच कॅश डिपॅाझीट मशिन, फंडस् ट्रान्स्फरसाठी आरटीजीएस, पॅन कार्ड सुविधा, लाईफ-जनरल इन्शुरन्स अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती अध्यक्ष निपुण कोरे यांनी दिली. यावेळी एटीएम मशिनचा प्रारंभ अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते झाला.  या समारंभास बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, युवा नेते विश्‍वेश कोरे, तसेच बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील, बळवंत पाटील, धोंडिराम सिद, अभिजित पाटील, प्रकाश माने,  यांच्यासह खातेदार, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.