Sun, Mar 24, 2019 08:30होमपेज › Kolhapur › वारणेत 13 रोजी कुस्ती महासंग्राम

वारणेत 13 रोजी कुस्ती महासंग्राम

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:41AM

बुकमार्क करा

वारणानगर : प्रतिनिधी

सलग 23 व्या वर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्लांच्या कुस्तीचा  महासंग्राम वारणानगर येथे बुधवार, 13 डिसेंबरला आयोजित केल्याची माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह आयोजित व भारतीय कुस्ती संघ, राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तेविसाव्या पुण्यस्मरणार्थ ‘विश्‍वनाथ वारणा कुस्ती महासंग्राम’ आयोजित केला आहे. 

या मैदानात ‘जनसुराज्यशक्‍ती श्री’ किताबासाठीची प्रथम क्रमांकाची लढत भारताचे हिंदकेसरी जास्सा पट्टी (पिद्दी आखाडा) व हिंदकेसरी कृष्णकुमार (सोनिपत) यांच्यात होणार आहे. तर वारणा साखर शक्‍ती किताबासाठी द्वितीय क्रमांकाची लढत भारतकेसरी साबा (पंजाब) व हिंदकेसरी जोगींदरसिंह (चांदरूप आखाडा) यांच्यात, तर तात्यासाहेब कोरे दूध वाहतूक शक्‍ती किताबासाठी तृतीय क्रमांकासाठीची पुण्याचा किरण भगत विरुद्ध दिल्लीचा  अजय गुज्जर यांच्यात होणार आहे. वारणा दूध संघ शक्‍ती किताबासाठी भगवंत केसरी माऊली जमदाडे (कोल्हापूर) विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी गोपाल यादव, वारणा ट्रॅक्टर वाहतूक शक्‍ती किताबासाठी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके (कोल्हापूर) विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे, वारणा बँक शक्‍ती किताबासाठी उपभारत केसरी बाला रफीक विरुद्ध हरियाणा केसरी प्रवीण भोला,  ईडीएफ मान शक्‍ती किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार विरुद्ध राष्ट्रीय विजेता शिवराज राक्षे, शेतीपूरक शक्‍ती किताबासाठी कौतुक डाफळे विरुद्ध लवप्रित, बिल्ट्युब शक्‍ती किताबासाठी  योगेश बोंबाळे विरुद्ध विलास डोईफोडे, शिक्षण मंडळ शक्‍ती किताबासाठी गणेश जगताप विरुद्ध  संतोष दोरवड, दूध कामगार संघटना शक्‍ती किताबासाठी मारुती जाधव विरुद्ध विकी, संग्राम पाटील विरुद्ध विष्णू खोसे, सचिन जामदार विरुद्ध अंकीतकुमार, शिवाजी पाटील विरुद्ध अशोककुमार अशा  लढती होणार आहेत.