होमपेज › Kolhapur › वीरधवल खाडेला रौप्यपदक

वीरधवल खाडेला रौप्यपदक

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 24 2018 1:31AMसिंगापूर :  

कोल्हापूरचा जलतरणपटू वीरधवल खाडे याला सिंगापूर राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक मिळाले आहे. 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात 22.68 सेकंदाची वेळ नोंदवत त्याने हे पदक पटकावले. या स्पर्धेत भारताच्या संदीप शेजवालने 50 मीटर ब्रेकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवले. वीरधवलला 50 मीटर बटरफ्लाय आणि 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात पाठोपाठ पोहावे लागल्यामुळे त्याला मीटर बटरफ्लायच्या अंतिम फेरीला मुकावे लागले.