Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Kolhapur › भाज्या कडाडल्या; धान्य बाजार स्थिर

भाज्या कडाडल्या; धान्य बाजार स्थिर

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 या आठवड्यात भाज्यांची आवक मोठी आहे पण सणाच्या पार्श्‍वभूमीवर भाज्यांचे दर मात्र भडकले आहेत. फळभाज्यांचे दर 40 ते 60 रुपये किलो झाले आहेत. पालेभाज्यांना दहा ते पंधरा रुपये पेंढी असा दर आला आहे. धान्य बाजार स्थिर आहे. भाज्यांची दरवाढ असली तरी पावटा व सर्व प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध असल्याने मागणीही मोठी आहे. 

फळभाज्यांमध्ये वांगी, दोडका, गवारी 60 रुपये किलो,  भेंडी, ढबू 40 रुपये किलोने उपलब्ध आहेत. फ्लॉवर 25 रु. नग, कोबी 15 रु. नग, आले 60 रु., लसूण 30 रु., कांदा 10 रु. किलोने उपलब्ध आहे. मेथी, पोकळा, शेपू या पालेभाज्या 10 ते 15 रुपये पेंढी प्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत.कोथिंबीर 20 रुपये पेंढी झाली आहे.  गाजर, काकडी, हिरवी मिरची देखील 40 रुपये किलो झाली आहे. बाजारात चोकिव आंबा, हापूसची आवक मोठी आहे. अगदी 70 ते 100 रुपयांपासून आंबे मिळत आहेत. तोतापुरी आंब्यांची आवक वाढली आहे. मोसंबी, संत्री, चिकू 50 ते 55 रुपये तर पायनापल नगाला 30 ते 40 रुपयांनी विक्री केले जात आहेत. फणस आकारानुसार 60 पासून 80 ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

आठवड्यात साखरेच्या दराने उचल खाल्‍ली आहे. साखर 35 रुपये किलो झाली आहे. बाकी धान्य बाजार स्थिर आहे. तुरडाळ 65 ते 72 रु., मुगडाळ 75 रु., हरभरा डाळ 55, मसुरडाळ 60 रु., मटकीडाळ 80 रु., उडीद डाळ 70 रु., चवळी 75 रु., चवळा 70 रु., ग्रीन वाटाणा 75 रु., काळा वाटाणा 60 रु., गहू 26 ते 35, ज्वारी 22 ते 32, पांढरा वाटाणा 42 रु., शेंगदाणे 80 रु.,साखर 35 रुपये, साबूदाणा 55 रु., वरी 70 रु., पोहे 40 रु., रवा 28 रु., मैदा 26 रु., सरकी तेल 88 रु., सनफ्लॉवर तेल 92 रु., शेंग तेल 115 रुपये.