Sun, Jul 21, 2019 08:19होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

शेतकर्‍यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:10AM

बुकमार्क करा

वारणानगर : प्रतिनिधी

रोजच्या जेवणाची गरज शेतकरीच पूर्ण करतो... त्यामुळे दूरदृष्टीने सर्वांनी शेतकर्‍यांना नवे तंत्रज्ञान आत्मसात करायला प्रोत्साहित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे बोलताना केले.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना व शेतीपूरक संस्थेच्या वतीने सर्वोच्च ऊस उत्पादन करणार्‍या आणि ऊस शेतीतील योगदान असणार्‍या वारणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच गटातील पाच पुरुष शेतकर्‍यांना स्व. तात्यासाहेब कोरे कृषीभूषण व पाच महिला शेतकर्‍यांना स्व. सावित्रीआक्का कोरे कृषीलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या व माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.  स्व. विलासदादा कोरे कृषीतंत्रज्ञ पुरस्कार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. 

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कृषीभूषण पुरस्कार ः छगन गणपती बच्चे (बच्चे सावर्डे), संजय हिंदुराव पाटील (चावरे), बाबुराव रघुनाथ मोहिते (घुणकी), जगन्नाथ रामा गुरव (ऐतवडे खुर्द), आनंदा केरू पाटील (सांगाव). 

स्व. सावित्रीआक्का कोरे कृषीलक्ष्मी पुरस्कार सुनीता उमेश बुढ्ढे (कोडोली), आशाराणी प्रकाश माळी (अंबप), संगीता भिकाजी मुळीक (टोप), मनीषा धनाजी गायकवाड (येलूर), पार्वती राजाराम शिंदे (चिकुर्डे). या प्रगतशील महिला शेतकर्‍यांना ‘स्व. स्वावित्रीआक्का कोरे’ कृषीलक्ष्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक उपाध्यक्ष आर. वाय खोत यांनी केले. यावेळी ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, डॉ. विनय कोरे, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, प्रमोद कोरे यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. सुभाष करडे यांनी आभार मानले.