Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Kolhapur › नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा पोलिसांसमोर पसार

नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा पोलिसांसमोर पसार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उत्तूर : दशरथ पाटील 

दोन हजारांवर लोकांना नोकरीच्या आमिषाने 25 कोटींचा गंडा घालणार्‍या चिमणे येथील जितेंद्र बंडू भोसले याने मंगळवारी फसवणूक झालेल्या लोकांसह पोलिसांना चकवा दिला. मेडिकल कॉलेजसह वर्ग दोन व वर्ग तीनच्या नोकर्‍या देतो, असे आमिष दाखवून सन 2003 पासून भोसले याने फसवणूक केली. शासनाच्या कामगार संघटनेचा मी अध्यक्ष आहे व मी नोकरी पक्की करतो, असे सांगून त्याने तरुणांकडून पैसे घेऊन फसवणूक केली आहे. अनेक तरुणांना बोगस ऑर्डरीही दिल्या. आज भावाच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने तो चिमणे येथे आल्याचे समजताच लगतच्या आजरा, चंदगड, गडहिंग्लज, करवीर, राधानगरी व कागल तालुक्यातील संबंधित तरुण उत्तूर येथे लक्ष्मी मंदिराजवळ जमा झाले. त्यांनी भोसले याला अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्याला जाऊन याबाबत बोलू, असे जितेंद्र याने पोलिसांना व संबंधित युवकांना सांगितले. ठाण्याच्या दिशेने तो जात असताना त्याला पकडण्यासाठी पोलिसांना तरुण सांगत असतानाच जितेंद्रच्या आलिशान गाड्या सुसाट निघून गेल्या. आजर्‍याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी संतप्त जमावाशी चर्चा केली व भोसले याच्याविरोधात तक्रार करण्याची सूचना केली. फसवणूक झालेल्यांनी पत्रकारांपुढे भोसले याच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला.