Wed, Jun 03, 2020 17:49होमपेज › Kolhapur › उर्मिला मातोंडकर भेटल्या शरद पवारांना!

उर्मिला मातोंडकर भेटल्या शरद पवारांना!

Published On: Aug 14 2019 9:27PM | Last Updated: Aug 14 2019 9:27PM

उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली.कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात पूरपरिस्थितीबाबत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ आदी नेते उपस्थित होते.

उर्मिला मातोंडकर यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी पूरबाधित भागात जाऊन पाहणी केली. तसेच शरद पवार यांनी देखील कोल्हापूर इथे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. मोडकळीस आलेली घरे, पाण्याखाली गेलेली शेतजमीन तसेच पूरामुळे पशूधनाची झालेली हानी मोठी आहे. अशा स्थितीत पूर परिस्थितीवर मात करण्याची हिंमत ठेवा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.  

या महापुरात ९० हजार कुटुंबे बेघर झाली आहेत. यापैकी ३२ हजार कुटुंबे शिरोळ तालुक्यातील आहेत. या सर्वांना पक्की घरे बांधून देऊन विस्थापितांचे पुनर्वसन करण्याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, असे पवार यांनी म्हटले आहे.