Fri, May 24, 2019 21:35होमपेज › Kolhapur › यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर

यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 1:06AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा (सिव्हिल सर्व्हिसेस) मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या परीक्षेत कोल्हापुरातील प्री. आयएस ट्रेनिंग सेंटरच्या मनोज आवटी, चंद्रशेखर घोडके, जयांकुर चौगले यांनी यश संपादन केले. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 19 फेब्रुवारीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शहाजहान रोड, नवी दिल्ली येथील कार्यालयात  होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांचे या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील अनेक उमेदवार दिल्ली, पुणे येथे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करतात. तसेच कोल्हापुरातही स्वयंअध्ययन करणार्‍या उमेदवारांची संख्या अधिक आहे. आयोगाकडून 28 आक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. या निकालानंतर मुलाखतीचा अंतिम टप्पा आहे. मुलाखतीच्या कार्यक्रमाची तारीख व वेळ याबाबतची माहिती 18 जानेवारीपासून आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मुलाखतीची तारीख व सूचना व्यक्‍तिगत स्वरूपात पाठवली जाणार नाही. काही अडचण निर्माण झाल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन  आयोगातर्फे करण्यात आले आहे.