Thu, Feb 21, 2019 05:02होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात जोरदार सरी

कोल्हापुरात जोरदार सरी

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री कोल्हापूर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. तर जिल्ह्याच्या जवळपास सर्व भागात पावसाने हजेरी लावली. सलग तिसर्‍या दिवशी ढगाळ हवामान राहिले. चंदगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी या परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

कोल्हापूर शहरात रात्री आठनंतर जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साठले. गुढीपाडवा पूजनासाठी लागणार्‍या साहित्याने बाजारपेठ सजली होती. ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने दुकानदारांची चांगली धांदल उडाली होती.

हा पाऊस उसाला उपयुक्‍त असला तरी रब्बी हंगामातील गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा या पिकासाठी हानिकारक आहे. आंबा, काजू या फळांवरही किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली आहे.