होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : डोळ्यात चटणी फेकून २० लाख लुटले

कोल्हापूर : डोळ्यात चटणी फेकून २० लाख लुटले

Published On: Feb 02 2018 4:24PM | Last Updated: Feb 02 2018 4:24PMकोल्हापूर :  गौरव डोंगरे 

दोघा वृद्धांच्या डोळ्यात चटणी फेकून, हातावर कोयत्याने वार करत वीस लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. कोल्हापुरातील सर्वांत मोठ्या आणि वाहनांची सतत वर्दळ असणाऱ्या ताराराणी चौकात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भर दिवसा ताराराणी चौकात हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चारूदत आण्णा कोगे (७०, रा चिंचवाड, करवीर) आणि दिनकर बंडोपंत जाधव (६५) यांच्याकडील २० लाख रुपये लुटण्यात आले आहेत. यात चारूदत्त यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर जाधव यांच्या डोळ्यात चटणी फेकण्यात आली आहे.