Sat, Nov 17, 2018 01:40होमपेज › Kolhapur › कुरुंदवाडमध्ये किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्‍ला

कुरुंदवाडमध्ये किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्‍ला

Published On: Apr 24 2018 10:37PM | Last Updated: Apr 24 2018 10:37PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरुंदवाडमध्ये किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्‍ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्‍ल्यात प्रशांत मनोज आमटे (वय२१) आणि राहुल किरण भबिरे (वय२१) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुनील भीमराव चव्‍हाण याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

मोटारसायकलला ओव्‍हरटेक करताना धक्‍का लागल्याने किरकोळ वाद झाला. याचा राग मनात धरून धारदार हत्याराने प्रशांत व मनोज यांच्या मानेवर हल्‍ला केला. यात ते दोघे जखमी झाले. याप्रकरणी करुंदवाड पोलिसांत जखमी प्रशांत आमटे याने तक्रातर दिली. नवबाग रोड, सन्‍मित्र चौक परिसरात ही घटना घडली.