Fri, Dec 13, 2019 00:31होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : कोलोलीत दोघांची आत्महत्या

कोल्‍हापूर : कोलोलीत दोघांची आत्महत्या

Published On: Dec 07 2018 11:01PM | Last Updated: Dec 07 2018 11:01PM
कोतोली : वार्ताहर  

पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे देवदीपावली सणाच्या तोंडावर दोघांनी आत्महत्या केली. अशोक राऊसो सावंत (वय 43) आणि राजेंद्र दत्तात्रय पवार (वय 35) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या दोघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंत यांच्या घरची परिस्थिती गरिबीची, त्यातच आई वारंवार आजारी असल्याने दवाखान्यातील खर्च व संसाराचा गाडा चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे सावंत मानसिक तणावाखाली होते. घरातून न सांगता बाहेर गेल्याने पत्नीने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ते कोठेही आढळले नाहीत. शुक्रवारी गावाशेजारील परीट वडा नावाच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाला त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. जाधव यांनी पन्हाळा पोलिसांना याबाबत माहिती दिली. दुसऱ्या घटनेत राजेंद्र पवार हा दारूच्या आहारी गेला होता. त्याने दारूच्या नशेत घरात विषारी द्रव पिऊन आत्‍महत्‍या केली. त्याला तत्काळ सीपीआर येथे पुढील उपचारासाठी नेले होते. उपचार सुरु असतानाच त्याचा सायंकाळी मृत्यू झाला.