Wed, Apr 24, 2019 00:22होमपेज › Kolhapur › कोथळीत दोन गटांत हाणामारी; १२ जखमी

कोथळीत दोन गटांत हाणामारी; १२ जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याच्या कारणावरून शुक्रवारी सकाळी कोथळी (ता. शिरोळ) येथे दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये 12 जण जखमी झाले  तर 19 जणांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी जयसिंगपूर पोलिसांत दाखल झाली आहे. 

बिरू आनंदा ऐवळे (वय 34) यांनी फिर्यादित म्हटले आहे की, सावकारकी करतो याबाबत सिद्धेश्‍वर हेगडे, सागर मुळीक, शुभम नांद्रे, सुनील चौगुले यांनी 15 दिवसांपूर्वी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. माझ्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, असे सुनील चौगुलेला फिर्यादी बिरू ऐवळे सांगत असताना संशयितानी मला,  माझ्या कुटुंबाला व नातेवाइकांना शिवीगाळ करून मारहाण केली.

तुकाराम चोखले (वय 26) याने फिर्यादित म्हटले आहे की, मी व माझ्या आईने संशयित आरोपीकडून चार महिन्यांपूर्वी 35 हजार रुपये घेतले होते. त्या कारणावरून बिरू ऐवळे   याने मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. माझा भाऊ संतोष याला विटांनी मारून जखमी केले. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केली.