Tue, Apr 23, 2019 01:50होमपेज › Kolhapur › कोंडिगे्रत जमीन वादातून दोन गटांमध्ये हाणामारी

कोंडिगे्रत जमीन वादातून दोन गटांमध्ये हाणामारी

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:08AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे शेतीच्या वादावरून नांद्रे व खिलारे या दोन गटांत लाथाबुक्क्यानी व काठीने जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडील पुरुष व महिला जखमी आहेत. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा नोंद झाला आहे. रविवारी दुपारी ही मारामारी झाली.

संदीप रत्नाकर नांद्रे (वय 19, रा.नांद्रे मळा, कोंडिग्रे) यांनी संशयित आरोपी खंडू बाजीराव खिलारे, अनिकेत भगवान खिलारे, गणेश पोवार, सारिका खंडू खिलारे, सुनीता खंडू खिलारे, सचिन खंडू खिलारे व अनोळखी तीन (सर्व रा. जांभळी, ता. शिरोळ) अशा नऊ जणांविरुद्ध लाथाबुक्क्या व काठीने तर खंडू बाजीराव खिलारे (वय 49, रा.जांभळी) यांनी  रत्नाकार श्रीपाल नांद्रे, सौ.संगीता रत्नाकर नांद्रे, प्रदीप रत्नाकर नांद्रे, संदीप रत्नाकर नांद्रे (सर्व रा.कोंडिगे्र) अशा चौघाविरुद्ध लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.

नांद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी व आई  उसाचा कांड्या गोळा करीत असताना खिलारे यांनी जमाव करून मारहाण केली. खिलारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या शेतातील तुतूची झाडे मी तोडणारच, असे म्हणत संदीप नांद्रे याने मला, पत्नी सौ.सुनीताला लाथाबुक्क्यानी व काठीने मारहाण केली.  मुलगी  सारिका हिला ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तपास हवालदार विक्रम चव्हाण करीत आहेत.