Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Kolhapur › दोन गटांतील हाणामारीत 5 महिलांसह 8 जखमी

दोन गटांतील हाणामारीत 5 महिलांसह 8 जखमी

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

घरासमोर दुचाकी उभी केल्याच्या कारणावरून नाना पाटीलनगरात दोन कुटुंबांत हाणामारी झाली. खुरपे, गज, दगड, काठ्यांच्या साहाय्याने दोन्ही गट एकमेकांना भिडले. यामध्ये पाच महिलांसह आठ जण जखमी झाले. राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

सगुबाई लक्ष्मण कोकरे (वय 55), संजय लक्ष्मण कोकरे (26), स्वाती संजय कोकरे (24), ज्योती झिलू कोकरे (20), आरती रामचंद्र कोकरे (26), सावित्री बाबुराव कोकरे (24), रामचंद्र लक्ष्मण कोकरे (वय 28), तर दुसर्‍या गटातील घाटू बाबू कोकरे (55, सर्व रा. महादेव कॉलनी, नाना पाटीलनगर) अशी जखमींची नावे आहेत. 

संजय कोकरे व घाटू कोकरे यांचे घर एकमेकांच्या शेजारी आहे. घरासमोर दुचाकी उभी करण्यावरून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. रविवारी सकाळी संजय कोकरे दारात उभा असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला. वादातून चिडून धनाजी कोकरे, बागोजी कोकरे, तानाजी कोकरे, घाटू कोकरे, बाबू कोकरे, सुनील कोकरे यांनी हल्‍ला केल्याची फिर्याद रामचंद्र कोकरे यांनी पोलिसांत दिली.

या सर्वांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर घाटू कोकरे यांचाही जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरारपर्यंत सुरू होते.