Mon, Feb 18, 2019 03:38होमपेज › Kolhapur › ‘तुकडे-बंदी’व्यवहार नियमित होणार

‘तुकडे-बंदी’व्यवहार नियमित होणार

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:39AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : अनिल देशमुख

‘तुकडे-बंदी’ कायद्यान्वये बेकायदेशीर ठरवण्यात आलेले व्यवहार नियमित केेले जाणार आहेत. महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी तशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी सांगितले. या निर्णयाचा  अनेकांना फायदा होणार आहे.

तुकडे-बंदी, तुकडा-जोडचा 1947 चा कायदा आहे. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी, तेथील जमिनीनुसार खरेदी-विक्रीची स्वतंत्र मर्यादा निश्‍चित केली आहे. यामुळे विक्री केल्यानंतर दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्र शिल्लक राहत असेल, तर असे व्यवहार रद्द ठरवण्यात येत होते. राज्य शासनाने कब्जेहक्‍काची रक्‍कम भरून घेऊन हे सर्व व्यवहार नियमित करण्याची अधिसूचना काढली आहे. जिल्हा प्रशासनाने कार्यवाहीचे आदेश सर्व संबंधितांना शुक्रवारी दिले आहेत.

तुकडे-बंदी कायद्यानुसार बेकायदेशीर ठरवलेल्या व्यवहारात चालू बाजारभावाच्या 25 टक्के रक्‍कम भरून घेतली जाणार आहे. अशा व्यवहारात ही रक्‍कम भरण्यास कोणी पुढे आले नाही, तर लगतच्या मिळकतधारकाला 50 टक्के रक्‍कम भरून घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. कोणीच आले नाही, तर संबंधित जमीन शासन ताब्यात घेणार आहे.