Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Kolhapur › ट्रॉलीखाली सापडून एक ठार

ट्रॉलीखाली सापडून एक ठार

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:21AMपन्हाळा/पुनाळ : वार्ताहर

पन्हाळा तालुक्यातील कोतोली-कणेरी रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रेलरच्या चाकाखाली सापडून कृष्णात गुंडा जंगम (रा.कोतोली) जागीच ठार झाले. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

जंगम भटजीचा व्यवसाय करतात. घुंगूर (ता. शाहूवाडी) येथील लग्‍न कार्यासाठी ते दुचाकीने (एम.09- ईएन.5360) जात होते. गुरवांच्या शेताजवळ कोतोलीकडून कणेरीकडे एक ट्रॅक्टर ट्रेलरसह जात होता. त्याला ओव्हरटेक करत असताना दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. ट्रॉलीचे मागील चाक  अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाई (जि. सातारा) येथील वाईकर मठाचे मठाधिपती शिवानंद महाराज यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, टॅक्टर कोतोली येथील जयसिंग बापू गायकवाड याच्या मालकीचा आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यात राहुल आंबुपे यांनी फिर्याद दिली असून उदय गायकवाड याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.