Wed, Jul 24, 2019 07:54होमपेज › Kolhapur › सीमालढ्यातील हुतात्म्यांना मराठा महासंघातर्फे अभिवादन

सीमालढ्यातील हुतात्म्यांना मराठा महासंघातर्फे अभिवादन

Published On: Jan 18 2018 11:33AM | Last Updated: Jan 18 2018 11:33AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

सीमा लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे बुधवारी अभिवादन करण्यात आले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेणबत्ती प्रज्वलीत करुन अभिवादन करण्यात आले. कोल्हापुरची जनता सीमावासियांच्या ठामपणे पाठीशी राहील असा ठराव यावेळी करण्यात आला.

17 जानेवारी 1956 संयुक्‍त महाराष्ट्र सीमा लढ्यात बेळगाव येथे झालेल्या पहिल्या लढ्यातील गोळीबारातील हुतात्मे कै. कमळाबाई मोहिते, कै. लक्ष्मण गावडे, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बागडी, कै. पै. मारुती बेकनाळकर आणि कोल्हापुरातील हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. बिंदू चौकात झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन करुन सीमावासियांच्या पाठीशी कायमपणे राहाण्याचा निर्धार केला. स्मृतीस्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उत्तम जाधव यांनी सीमावासियांच्या कोल्हापुरची जनता ठामपणे पाठीशी राहील या ठरावाचे वाचन केले.

कार्यक्रमास महापौर सौ. स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, वसंतराव मुळीक, अ‍ॅड. धनंजय पठाडे, व्यंकाप्पा भोसले, डॉ. शरद गायकवाड, भगवानराव काटे, शंकरराव शेळके, संभाजीराव जगदाळे उपस्थित होते. कादर मलबारी यांनी आभार मानले.