Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Kolhapur › उदगाव : रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक; वाहतुक विस्कळीत

उदगाव : रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक; वाहतुक विस्कळीत

Published On: Mar 03 2018 10:35AM | Last Updated: Mar 03 2018 10:35AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

सांगली-जयसिंगपूर रेल्वे मागार्वरील उदगावय येथे रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे पुलाला धोका आहे का? याची तपासणी करण्यात येत असल्याने या मार्गावरील वाहतुक वळवली आहे. यामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,‘उदगाव रेल्वे पुलाला मध्यरात्री अज्ञात टँकरची धडक बसल्याने पुलाला धोका आहे का याची रेल्वे खात्याकडून तपासणी करण्यात येत आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक जैनापूर बायपासवरुन वळवण्यात आली. जयसिंगपुरकडून वाहतूक बंद करण्यात आली असून उदगाव रेल्वेस्टेशन रस्ता व जयसिंगपूर  क्रांती चौकातून स्टेशन रोडने वाहतूक सुरू आहे.