Wed, Oct 16, 2019 18:26होमपेज › Kolhapur › महापुराच्या सावटात आज रक्षाबंधन

महापुराच्या सावटात आज रक्षाबंधन

Published On: Aug 14 2019 11:23PM | Last Updated: Aug 14 2019 11:23PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो कुटुंबांची ससेहोलपट सुरू आहे. डोळ्यांसमोर जमीनदोस्?त झालेले संसार सावरण्यात अद्याप पूरग्रस्त व्यग्र आहेत. शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र ही परिस्थिती असल्याने सर्वच सणांवर परिणाम झाला आहे. 

रक्षाबंधनाच्या आधी दहा-पंधरा दिवस शहरभर राख्यांचे स्टॉल सजतात आणि खरेदी सुरू होते; पण अद्याप शहर सुन्‍न असून अनेक शहरवासीय पूरग्रस्त निवारा छावणीतच आहेत, असे असताना सण साजरा कसा करायचा? रक्षाबंधनही साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय शहरातील अनेक कुटुंबांनी घेतला आहे. अनेक भागात अद्याप वीज नाही, पाणी नाही. शहरातही पाण्याची आणीबाणी असल्याने सणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. 

ओवाळणी पूरग्रस्तांना

 जिल्?ह्यावर ओढावलेल्या पूरपरिस्थितीने अनेक कुटुंबांची परिस्थिती बिकट बनली आहे. या सर्व पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी हजारो कोल्?हापूरकरांचे हात सरसावले आहेत. अशात बहिणींनीही पुढाकार घेतला आहे. शहरातील अनेक महाविद्यालयीन युवतींनी यंदाच्या रक्षाबंधनाची ओवाळणी पूरग्रस्तांना देण्याचे सोशल मीडियावर आवाहन केले आहे. अनेक बहिणींनी केवळ ओवाळणीच नाही, तर स्वत:चे साठवलेले पैसे देण्याची तयारीही दाखवली आहे.