Thu, Nov 15, 2018 10:22होमपेज › Kolhapur › डॉ. प्रतापसिंह जाधव यांना आज समाजभूषण पुरस्कार प्रदान

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना आज समाजभूषण पुरस्कार प्रदान

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

येथील संत गाडगे महाराज अध्यासनाचा समाजभूषण पुरस्कार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि. 9) प्रदान करण्यात येणार आहे. 

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे -पाटील आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मानव जीवनाला स्पर्श करणार्‍या नेत्रदीपक कार्याबद्दल संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. अध्यासनाचे अध्यक्ष रा. तु. भगत यांनी पत्रकात ही माहिती दिली आहे.