Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Kolhapur › शहरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा

शहरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावल्याने नदीत पाणी कमी आहे. परिणामी, शिंगणापूर बंधार्‍याजवळ पाणी पातळी कमी झाल्याने चारपैकी दोनच पंप चालू आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे. 

जलसिंचन विभागाच्या वतीने धरणातून नदीत पाणी सोडले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत ते पाणी शिंगणापूर बंधार्‍यापर्यंत येईल. पंचगंगा नदीतून शहरासाठी पाणी उपसा करणारे शिंगणापूर उपसा केंद्राचे चारही पंप पूर्ववत होतील. त्यानंतर शुक्रवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. पाणी पातळी कमी होऊ लागल्यावर महापालिका अधिकार्‍यांनी त्वरित जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करून धरणातून पाणी सोडण्यास सांगायला पाहिजे होते; परंतु अधिकार्‍यांना त्याचे  सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. शहरातील सहा लाख लोकांचा प्रश्‍न असूनही  महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने शहरात पाण्याचा ठणठणात होण्यासाठी अधिकार्‍यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे..

Tags : Kolhapur, Kolhapur News, today, Low, pressure, water, city 


  •