Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Kolhapur › दत्तवाडला जुगार अड्ड्यावर छापा; १६ जण ताब्यात

दत्तवाडला जुगार अड्ड्यावर छापा; १६ जण ताब्यात

Published On: Jun 11 2018 12:27AM | Last Updated: Jun 11 2018 12:27AMकुरूंदवाड : प्रतिनिधी

दत्तवाड (ता. शिरोळ) येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत 16 जणांना ताब्यात घेऊन 57 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व कुरूंदवाड पोलिस ठाणे यांच्या वतीने करण्यात आली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (दि.10) रात्री 9 वा. सुमारास दत्तवाड दरम्यानच्या दानवाड रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये नूर कासिम काले (वय 45, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) हा सहारा कला, क्रीडा, सांस्कृतिक व मनोरंजन मंडळ या नावाने चालवत असलेल्या क्लबवर छापा टाकला असता पैसे लावून तीन पाणी पत्त्याचा जुगार  खेळत असताना सुनील रविकांत कळकुटे (रा.शेडबाळ, ता. कागवाड)  संजय गणपती खोत (रा. मलिकवाड, ता. चिक्कोडी) महांतेश बसवराज बेळेशी, महानतेशी राजू पाटील (दोघे रा. जलालपूर, ता. रायबाग) राजेश अशोक कुंभार, संतोष भोपाळ अमानगे, नवाज बाबासाहेब सनदी (तिघे रा. जुगुळ, ता. कागवाड), मोहन अरुण माळी, सागर आप्पासाो शिरगावे, दादा रघुनाथ धुमाळे, कल्लाप्पा भरमा कांबळे, किरण आण्णाप्पा कांबळे, धीरज बाळू कांबळे, विठ्ठल शंकर कांबळे (सर्व रा. दत्तवाड, ता. शिरोळ) व विठ्ठल बंडू खोत (रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) यांना ताब्यात घेऊन 57 हजार रुपये रोख रक्कम 4 मोबाईल संच व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.