Wed, May 22, 2019 16:21होमपेज › Kolhapur › राजारामपुरीत दहशत माजविणारे तिघे तडीपार जेरबंद

राजारामपुरीत दहशत माजविणारे तिघे तडीपार जेरबंद

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून राजारामपुरी परिसरात दहशत माजविणार्‍या पोलिस रेकॉर्डवरील तिघा सराईत गुन्हेगारांना राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

अमित सुरेश दिंडे (वय 20, रा.14 वी गल्ली, राजारामपुरी), रोहित परशुराम कुर्‍हाडे  (21, पंतमंदिराशेजारी शाहूनगर), आसू बादशाह शेख (23, छत्रपती मंडळाजवळ, दौलतनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

दिंडेसह तिघाही संशयितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.जानेवारी 2018 मध्ये पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून संशयित पुन्हा दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिस निरीक्षक औंदुबर पाटीलसह पथकाने आज, गुरुवारी सकाळी तिघांच्या मुसक्या आवळत अटकेची कारवाई केली.