गारगोटी : प्रतिनिधी
पुष्पनगर येथील बेबीताई श्रीपती चोरगे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे पंधरा तोळे सोने व चार हजार रोख असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे.
बेबीताई यांचे घर गावभागात आहे. दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त त्या शेजारी गेल्या होत्या. घराचा दरवाजा उघडा असल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे वळे, अंगठी, सोनसाखळी, लक्ष्मीहार व चार हजार रोख असा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. डी. मांगले करीत आहेत.