Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Kolhapur › जवाहरनगरात दोन गटांत वाद; वाहनांची तोडफोड

जवाहरनगरात दोन गटांत वाद; वाहनांची तोडफोड

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:05AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादातून जवाहरनगरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सागर सुरेश जाधव (वय 26), सूरज इंद्रेकर, टिपू शेख (सर्व रा.  जवाहरनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

जवाहरनगरातील तामुद्दीन बागवान व सागर जाधव हे समोरासमोर राहण्यास आहेत. दोघांत काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला होता. रविवारी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांत पुन्हा वादावादी झाली.

यातून चिडून सागर जाधवने आपल्या दोन साथीदारांसह तामुद्दीनचे मेहुणे इरफान खताल यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत रिक्षा व दुचाकींची तोडफोड केली. याबाबत राजारामपुरी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.